मुळात तुमची बँक डी. डी. च्या माध्यमातून (तुमच्याकडून)  पैसे घेऊन ते तुम्हांला ज्या दुसऱ्या पक्षाला द्यायचे असतात, त्या पक्षाकडे पोहोचते करीत असते. ही बँकेने तुम्हाला दिलेली सेवा असते. त्यामुळे त्याचा भार ( चार्ज ) अर्थातच तुमच्याकडूनच घेतला जाणार. त्यातही तुमचे त्या बेंकेत खाते असेल तर तुम्हांला कमी भार व खाते नसेल तर त्यापेक्षा थोडा जास्त भार असाही प्रकार असतो.