खरंच..एवढं मनावर घेऊ नका

लग्नात गाणं किंवा इतर कोणतीही कला सादर करवण्यासाठी लोकांना फक्त हौस असते. आमच्या लग्नात आम्ही "अस्सा" कार्यक्रम केला असा शिक्का फक्त लोकांना हवा असतो. 
कुठलेही लग्न किंबहुना कोणताही घरगुती समारंभ हा कला सादर करण्याची जागाच नाही असे माझे स्पष्ट मत आहे. मी स्वतः ह्या अनुभवातून गेलो आहे. आपण जीव तोडून आपलं काम करत असतो आणि लोकांना त्याची काहीही पडलेली नसते. त्यात कुठेही नातेवाईक जमले की, ए हा अमुक अमुक चांगला गातो वगैरे कळलं की त्याचा पार माकड करायला आणि काहीतरी टाईमपास श्रवणभक्ती करायला लोक टपलेलेच असतात. त्यामुळे अशा ठिकाणी कार्यक्रम सादर न करणंच चांगलं. 

अनेक कलाकार मंडळी अशा कार्यक्रमांचे मजबूत मानधन आकारून कार्यक्रमात पाट्या टाकतात. पाट्या टाकायचेच पैसे घेतल्यासारखे. पण हे आपल्या तत्त्वात बसत नाही. तेव्हा अशा कार्यक्रमांना नाही म्हणणे हेच योग्य. असो.