श्री. प्रदीपजींनी संदर्भ दिलेला " हुंदके " हा मृत्युलेखांचा संग्रह मी कॉलेजमध्ये असतानाच वाचला होता. त्यामध्ये दिलेल्या सर्वच व्यक्तिचित्रांबाबत उपेक्षेचे किंवा छंदीफंदी जीवन जगणारे लोक असाच माझाही समज झाला होता. त्या तूलनेत आपण दिलेली माहिती एकदमच वेगळी आहे. रस्त्यावर भीक मागत बसलेल्या निफाडकरांचे वर्णन वाचताना मनात अक्षरशः कविता जमली नाही तरी चालेल, पण आपले आयुष्य चारचौघांसारखे असलेच पाहिजे, असे सतत घोकत राहिल्याचेही आठवते. नेमकी कविता कोणाची हे सांगता येणार नाही, पण हा संदर्भही "हुंदके" मध्ये आला आहे. या लेखातील कवीने बिभत्स रसाचाही अपमान केला आहे. आईच्या अंगावर खेळणाऱ्या बालकाला पाहताना त्या कवीने त्या बालकाच्या त्या हालचालींमध्येही शारिरीक वासनाच पाहिली आहे. दुसऱ्या एका कवीच्या संदर्भातही एक प्रसंग लक्षात राहिला, तो म्हणजे पत्नी मृत्युशय्येवर असताना तिच्यावर उपचार करण्यासाठीही त्या कवीकडे पैसे नव्हते. त्याने आपली कविताच त्या डॉक्टरला देऊ केली. एकूणच त्या पुस्तकातील सर्वच व्यक्तिचित्रे काहीशी निराश करणारी आहेत. त्यामुळे प्रदीपजींचा लेख वाचायला सुरूवात करतानाच तेच हे निफाडकर का अशीही शंका मनात आली होती. लेख वाचताना ती बरोबर आहे हेही स्पष्ट झाले. त्या उलट निफाडकर हे  प्रासादिक कवी नि एतिहासिक कादंबरीकार असल्याची आपली नोंद त्यामुळेच अपेक्षेपेक्षा वेगळी वाटली.