वृत्तांची नावे तुम्ही जेवढ्या लवकर विसराल, तेवढ्या लवकर तुम्ही वृत्तात सफाईदार रचना करू लागाल!
वृत्तांची नावे ही केवळ उपचारापुरती, ओळखीपुरती आहेत, हे ध्यानी असू द्या.
नाव लक्षात राहिल्याने माणसाची ओळख लागू शकते, पण तो कळतोच असे मात्र नव्हे! तो कळायला हवा. आतून-बाहेरून कळायला हवा. तो कळून घेण्याची कला शिका. पुढचे सारे सोपे होत जाईल.
वृत्ताच्या नावातच अडकून राहिलात तर कवितेचा प्राण, जीव, आत्मा गमावून बसाल...
मनात मुरलेल्या सर्वस्वी नव्या ओळीची (पठडीबाज वृत्तांहून अगदी वेगळी) लय ठीक पकडून लिहिलेत, तर अधिक चांगले... कधी तरी असाही प्रयोग करून पाहा.
'चालक शिकत आहे' हा बोर्ड कधी काढायचा हे तुमच्या आणि तुमच्याच हातात आहे. गाडी शिकविणाऱयाच्या नव्हे!!
नव्या रचनेच्या प्रतीक्षेत.