टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रकृती सुधारून परत सक्रीय होत आहेत ही चांगली बातमी आहे. १ मेच्या कार्यक्रमातली त्यांची उपस्थिती शिवसैनिकांना नवी उमेद देवून गेली असणार यात शंकाच नाही. बाळासाहेबांनी काही विधान केले की गदारोळ उडालाच पाहिजे व माध्यमांना पुढचे काही दिवस मथळा काय द्यायचा याची काळजी करावी लागत नाही. “अमरनाथ यात्रेला अडथळा आणाल तर हज यात्रा बंद पाडू” किंवा खलिस्तान प्रश्न पेटला असताना मुंबईत शीख समुदायावर बहिष्कार टाकण्याचे वक्तव्य चांगलीच गाजली होती. पण कधीतरी बाळासाहेबांचा बोलताना तोल सूटतो. यात बाळासाहेबांची गोची होतेच (अर्थात ...