आपले मुंबईचे भय्ये टॅक्सीवाले अगदी हेच करतात असा माझा अनुभव आहे. माटुंग्यात विचारावे ''दादर'? भय्या मखखपणे दुसरीकडे पाहणार, तुमच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून. पूर्वी-- म्हणजे सुमारे दहा-पंधरा वर्षांपूर्वी ते निदान दूरच्या ठिकाणास यावयास तरी तयार असायचे. आता तेही नाही. माटुंग्यात विचारावे 'बोरिवली?'-- परत भय्या म. दु. पा. च!! तेव्हा मला वरील लेखकास पडलेला प्रश्नच नेहमी पडतो, 'ह्यांचे रेव्हेन्यू स्ट्रीम्स नक्की कुठले आहेत?'