कसदार अनुभवाची नेटकी मांडणी करणारे लिखाण आवडले.

रेणू गावस्करांच्या 'आमचा काय गुन्हा'तील अशाच अनुभवाची आठवण आली. माटुंग्याच्या डेव्हिड ससून रिमांड होममध्ये त्या समाजसेवा करीत. तेथील प्रार्थनेचे त्यांनी वर्णन केले आहे. एरव्ही अगदी हूड समजला गेलेला एक थोराड मुलगा 'ऐ मालिक तेरे बंदे हम' ही प्रार्थना अगदी समरसून गाई, व ती गातांना त्याच्या डोळ्यांतून अश्रूप्रवाह होत असे, असे त्यांनी नमूद केले आहे.