संचेती समोर मी उभा होतो एक पण रिक्शावाला कर्वे पुतळ्या जवळ येण्या साठी तयार नव्हता मग मी गंमत केली एका रिक्शावाल्या ला विचारली की तुम्हाला कोठे जायचे आहे ? मला कर्वे रोड वर जायचे आहे . त्याने सांगितले की मी गावात जात आहे तुम्हाला लकडी पुला जवळ सोडतो . सच्चा मुसलमान होता तो . त्याने सांगितले की गाडी बंद करायची वेळ झाली आहे आणि क पु पासून येताना रिकामे यावे लगते .पण आमचे वया कडे बघून त्याला काय वाटले कोणास ठाऊक लकडी पुला जवळ आल्यावर तो क पु पर्यंत येण्यास तयार झाला मग मी स्वतःहून त्याला दहा रुपये जास्त दिले