आमच्या इमारतीत एक वयोवृद्ध आजोबा त्यांच्या मोठ्या कुटुंबासमवेत राहायचे. त्यांचे लक्ष्मी रोडला कापडाचे दुकान होते. म्हातारबाबा दुकानात नसले की रिकामटेकडेच असायचे. कोणी ओळखीचा, इमारतीतील रहिवासी दिसला की त्याला हटकून म्हणायचे, ''काय भानगड आहे? '' आणि हा प्रश्न ते सरसकट सर्वांना, म्हणजे बाप्ये लोक आणि बायामाणसांनाही विचारायचे. केवळ आणि केवळ त्यांचे वय पाहून लोक त्यांना उद्धट उत्तर देण्याचे टाळायचे.... तरीही इमारतीतील काही आचरट पोरांनी त्या आजोबांना उत्तरे दिलीच, ''आजोबा, आता ह्या वयात कसले भानगडी ऐकून राह्यला तुम्ही! ''