छान आठवण! अशीच कैऱ्यांच्या लोणच्याची आठवण जागी झाली! ती कैरी खरेदी, तयारी, चिराचिरी, मसाल्या-तीखटाचे हात, लोणचे बरण्यांमध्ये भरणे, बच्चे कंपनीची लुडबूड, कैरीच्या फोडी लांबविणे, त्या वेळेत लहानांमधील ज्यांचे हात मोकळे व स्वच्छ असतील त्यांनी लोणची घालणाऱ्या महिलांची सेवा करणे (उदा : डोळ्यावरची केसांची बट बाजूला करणे, प्यायला पाणी देणे इ. इ. ) .... दुपारभर चालणारा तो साग्रसंगीत सोहोळा आठवला आणि छान वाटले!
आता तसे एकत्र जमून ना लोणचे घालणे होत, ना पापड लाटणे.... इन्स्टंट आणायचे किंवा आपल्या घरापुरते थोडेच करायचे!
पण लेख वाचून मजा आली!!