प्रदीप कुलकर्णी, यशवंत जोशी, अरुंधती कुलकर्णी प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद!
कैरीचे लोणचे म्हणजे अगदी हळवी करून सोडणारी आठवण आहे. हिरव्यागार कैऱ्या... आंबटढाण कैऱ्या.. चिरताना चर्र असा आवाज येणार... लोणचे घालताना तिखटमीठ लावून खायच्या फोडी... वर्षाचे लोणचे... त्याचबरोबर ताजे लोणचे... नुसतेच तिखट मीठ तेल घालून कच्चे लोणचे... मोहरी फेसून त्यात गूळ घालून गोड लोणचे...कैरीच्या बाठीशी असलेला गर जास्तीत जास्त काढून त्याचेही एक वेगळे लोणचे बनवणे... अहाहा... ताजे घातलेले लोणचे लगेचच चिंचगूळ घालून केलेल्या गरम गरम आमटी भाताबरोबर ओरपणे... लोणचे घालताना हळदटलेली ताटेच जेवायला वापरणे... एक ना अनेक आठवणी. खरेच एक महोस्तवच!