भाषा शुद्धी म्हणजे काय?
हा प्रश्न मला ही अजून सुटलेला नाहीये . ( सावरकरांनी अशी काही तरी चळवळ सुरू केली होती म्हणे , जाणकारांनी माहीती द्यावी . )
पण विविधते मध्ये एकता हा निसर्गाचा नियम आहे असे म्हणतात , त्या मुळे जितकी भाषिक विविधता येइल तितकी भाषा जास्त समृद्ध होइल असे मला वाटते . टोमॅटो ला टोमॅटोच म्हणावे , उगाच " पावशेर भेदरे/भेद्रे द्या " असे म्हणाला तर भाजीवाली ( अर्थ न कळल्याने ) भ वरून सुरू होणारी खणखणीत शिवी देइल .
शिवी वरू आठवले परवाच्या मिंट पेपरला लेख होता की भारतात दिल्या जाणाऱ्या बऱ्याचशा शिव्यांचा उगम फार्सी आहे.
( भाषा शुद्धी समर्थकांनी त्याला पर्यायी शब्द सुचवावेत , ते मजेशीर असतील कदाचित शिवाय कोणाला कळणार ही नाहीत!!)
तांत्रिक शिक्षणात उगाच अनुवाद करू नये >>> हे अगदी बरोबर आहे .
माझा क्षेत्रातील काही शब्द सुचवतो त्याला पर्यायी " शुद्ध"आणि सहज सोपे समजणारे मराठी शब्द असुच शकत नाहीत
हाय्पोथेसीस , अक्झियम,पोस्चुलेट , कंजक्चर , लेम्मा ,करोलरी , इंडकशन , रिग्रेशन , फोरवर्ड इंटर्पोलेशन , डेरीव्हेशन , इंटीग्रेशन , डिफरन्शीयल जोमेट्री , ग्रुप , ओर्ड्र्ड ग्रुप , रिंग , फिल्ड , वेक्टर फिल्ड , टोपोलोजी , कोंपक्ट सेट , वगैरे वगैरे ...