माझा क्षेत्रातील काही शब्द सुचवतो त्याला पर्यायी " शुद्ध"आणि सहज सोपे समजणारे  मराठी शब्द असुच शकत नाहीत

आपल्याला आपल्या अभ्यासक्षेत्रातील काही लेखन मराठीत करायचे आहे; पण योग्य शब्द न मिळाल्याने अडचण येऊन विषादाने म्हणत आहात असे गृहीत धरून काही पर्याय सुचवत आहे. मनोगतावर पूर्वी  विज्ञानविषयक गणितविषयक लेखन झालेले आहे तेही नजरेखालून घालता येईल, असेही सुचवावेसे वाटते.

हायपोथेसीस = परिकल्पना
अक्झियम = स्वयंसिद्धक, गृहीतक
पॉस्चुलेट = आधारतत्त्व
कंजक्चर  = १ संयोग  २ स्थितिविशेष  ३ कठीण प्रसंग
लेम्मा = सहायक प्रमेय
करोलरी  = उपसिद्धांत
इंडक्शन = प्रवर्तन . प्रेरण उद्गमन (तर्कशास्त्र)
रिग्रेशन = समाश्रयण, (तत्त्व.) परागति, परागमन  पीछेहाट (सागरी )
फॉरवर्ड इंटर्पोलेशन = अग्रेनीत(?) अंतर्वेशन
डेरिव्हेशन = अनुसिद्धता
इंटिग्रेशन =  (तत्त्व.) पूर्णीकरण, संपूरण, एकात्मीकरण (ग.) समाकलन
डिफरन्शियल जॉमेट्री  = अवकल भूमिति
ग्रुप = गट, समूह
ऑर्डर्ड ग्रुप , क्रमित गट
रिंग = कंकणाकृति, कडे, वलय
फील्ड = क्षेत्र
वेक्टर फील्ड = सदिश क्षेत्र
टोपॉलॉजी  = संस्थिति संस्थितिविज्ञान
कॉम्पॅक्ट सेट = संहत संच

आपल्याला अधिक स्वारस्य आहे असे दिसल्यास ह्यावर अधिक लिहिता येईल.