माझे जगणे होते गाणे !! येथे हे वाचायला मिळाले:

श्रावणातली ओलीसर्द सकाळ असावी...... सोनहळवं उन पानापानातून चमचमत असावं......
थेंबांचा गारवा आणि पूर्वेचा तेजोमय सखा मनाला थार्‍यावर राहू देत नसावा..... अन् अश्याच भारावलेल्या समयी कानावर पडावेत कोवळीकेचे सूर... तेच सूर जे वृंदावनात भगवंतांच्या वेणुमधून घुमले होते.. तेच सूर जे हिमालयाने गंगेच्या खळाळत्या पात्रात ओतले होते... तेच सूर जे समुद्रावरून वाहणार्‍या वार्‍याने गच्च धरून ठेवले होते आणि तेच सूर जे आठ महिने तुम्हा-आम्हा सर्वांचा जीव की प्राण होऊन गेले होते.
केवढं हे काव्यात्मक स्वप्न !! असे कोणं बरे होते ते देहभान हरपून टाकणारे ...
पुढे वाचा. : आठवा स्वर