अमावस्या आणि पोर्णिमा म्हणजे भरती ओहटीचा काळ. जर ह्या काळाचा प्रभाव निसर्गावर होऊ शकतो तर मानवावर का नाहि? कारण तोही ह्या निसर्गाचा एक अविभाज्य घटकच ना!. अस ही एक ह्या धरतीवर पाण्याचा भाग टक्केवारी प्रमाणे जमिनीच्या तुलनेत अधिक आहे आणि प्रत्येक प्राणिमात्रात ह्याच सरासरीत पाण्याचा आणि मातीचा भाग आहे. दुसरे चंद्राचा संबध ज्योतीशास्त्राप्रमाणे मनाशी जोडले गेले असल्यामुळे ह्या दिवसात मनावर त्याचा परिणाम होतोच होतो. म्हणुनच की काय ह्याच दिवसात वेड्यांना झटके येण्याचे प्रमाण जास्त असते. दुर्धर आजाराने, अपघाताने जगण्यासाठी संघर्ष करणारे रुग्ण ह्याच काळाच्या आसपास दगावतात.
थोडक्यात मानवी मन, प्राणीमात्रावर निसर्गाचा परिणाम होतोच होतो.