आपण दिलेल्या शब्दसुची बद्दल आभार !
पण महेश , हे शब्द मुळ इंग्रजी शब्दा पेक्षा सोपे सहज नाहीयेत , शिवाय एंग्रजी शब्द विकी पेडीया वर टाकला तर किमान थोडी फार तरी माहीती मिळते ,आपण सुचवलेल्या मराठी शब्दांबाबत हे शक्य नाही . (उदा .अभ्युपगम म्हणजे काय ? इंडक्टीव लोजीक की डीडक्टीव लोजीक ? असा प्रश्न गेले काही दिवस मला सतावत आहे ! )
मनोगतावर पूर्वी विज्ञानविषयक गणितविषयक लेखन झालेले आहे तेही नजरेखालून
घालता येईल >>> जरूर जरुर . आपण दुवा दिल्यास मी आपणाला दुवा देइन
( आभारी राहीन ) .
आपल्याला आपल्या अभ्यासक्षेत्रातील काही लेखन मराठीत करायचे आहे; पण योग्य
शब्द न मिळाल्याने अडचण येऊन विषादाने म्हणत आहात +आपल्याला अधिक स्वारस्य आहे असे दिसल्यास ह्यावर अधिक लिहिता येईल >>>
अगदी अगदी . परवाच माझ्या मनात गणित या विषयाची संबंधीत एक सायन्स फिक्शन ( मराठी? ) आली . पण पर्यायी मराठी शब्द न सापडल्याने अन " एखादे , फर्मॅट थेरम सारखे , गणित सुटणे ही फिक्शन असू शकते" हे कितपत स्विकारले जाईल या शंकेने लिहू शकत नाहीये .
आपण आधिक माहीती दिल्यास आवडेलच !!!