झाले मोकळे आकाश येथे हे वाचायला मिळाले:
नवर्याने आयुष्यात एक काम धड केलं नाही. हिनेच त्याला खाऊ - पिऊ घालायचं, संसाराचं गाडं ओढायचं. त्याने फक्त रिकामटेकड्या शिष्यांना गोळा करायचं, आणि दिवसभर तोंडपाटीलकी करायची. या सत्याच्या शोधाने कधी कुणाचं पोट भरलंय? काही कामधंदा नको का माणसाला? काही पोटापाण्याची व्यवस्था?