पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवाला हल्ली सगळीकडून पर्यटक येतात. माझ्या लहानपणी इतके नसले तरी बाहेरगावावाहून बरीच मंडळी यायची. तेव्हा हा महोत्सव रेणुका स्वरूप मेमोरिअल हायस्कूलमध्ये (तेव्हाचे मुलींचे भावेस्कूल) व्हायचा. तेव्हा एकजण मला शनिपारापाशी रेणुकास्वरूपचा पत्ता विचारू लागला. ते तिथून लांब नसले तरी पत्ता सांगायला गुंतागुंतीचे आहे. त्यामुळे सांगणे अगदी कठीण होते. तरी मी त्याला सरळ जा, अमूक चौकात उजवीकडे पुढे डावीकडे असा काहीसा पत्ता सांगितला.