माझे जगणे होते गाणे !! येथे हे वाचायला मिळाले:
उद्या १ जून २०१०. 'डेक्कन क्वीन' ऐंशी वर्षे पुर्ण करून ऐक्यांशीव्या वर्षात पदार्पण करत आहे. इतर अनेक पुणेकरांसारखी माझ्या भावविश्वात अढळ स्थान मिळवलेली ही गाडी. रूळांवरचं चालतं-बोलतं एक उत्कट जगच... बहुरंगी, बहुढंगी..... हवंहवंस वाटणारं..... माझे आणि डेक्कन क्वीनचे ऋणानुबंध जवळपास गेल्या बारा वर्षांचे. त्यामुळे आठवणीही अगणित...........