हे शब्द अवघड आहेत?   मला नाही वाटत.  गृहीतक, प्रमेय, उपसिद्धान्‍त(सिद्धांत नाही, त्याचा अर्थ वेगळा होतो! ) हे दैनंदिन वापरातले शब्द. हायपॉथिसिस, पॉस्च्युलेट, लेम्मा हे शब्द तर कित्येक वर्षांत वापरले नाहीत. आमच्या लहानपणी आम्ही थेरमसाठी प्रमेय आणि त्याच्या कॉरोलरीसाठी उपप्रमेय वापरत असू,  एखाद्या सिद्धान्‍ताची(प्रिन्सिपलची) कॉरोलरी असेल तर तो उपसिद्धा‍न्‍त. डेरिव्हेशन म्हणजे पायरीपायरीची सिद्धता. सर्व इंग्रजी शब्दांसाठी एकशब्दीय प्रतिशब्द पाहिजे असा अनाकारण आग्रह का? ऑर्डर्ड ग्रुपसाठी विषयवार गट, अनुगट, अनुसंच  वगैरे.
उत्क्रांती--आपोआप होणारा बदल, उद्भवणे--आपोआप होणे, निभवणे--प्रयत्‍नपूर्वक असणे; त्याचप्रमाणे उद्गमन--आपोआप जाणे/जाणणे/होणे, इन्डक्शन; निगम--निश्चयपूर्वक/प्रयत्‍नपूर्वक जाणे/जाणणे/करणे/काढणे, डिडक्शन. निष्कर्ष, नगरनिगम, निवारण, या शब्दांमध्ये 'नि'चा प्रयत्‍नपूर्वक हाच अर्थ अभिप्रेत आहे.