नज़्‍र आणि  नज़र यांचे अर्थ वेगळे आहेत, हे कधी लक्षातच आले नव्हते. अर्पण आणि निगाह यांच्या संदर्भात हे शब्द वेगवेगळे उच्चारलेले नि ऐकलेले आठवले. साध्या शब्दकोशातमात्र हे दोन्ही शब्द एकाच अर्थाचे दिल्याचे आढळले.  बारीकसारीक अर्थच्छटा दाखवून उपयोगकर्त्याचा उगाच गोंधळ होऊ नये, हा हेतू असावा. कधी मोठा कोश हाती आला की ख़ातिरजमा करून घेईन.
भाषेची प्रतिष्ठा कमी होते हा प्रयोग मूळ प्रतिसादकाने केला होता, म्हणून तसाच ठेवला. मथितार्थ, भेद्रसारखे शब्द मराठी प्रमाणभाषेत शोभून दिसत नाहीत. ते कोठूनतरी ओढूनताणून आणल्यासारखे वाटतात.