ज्या मुलाच्या तुटलेल्या शब्दांचं,
वाक्य बनवून अर्थ उमजून घेतला.
त्याच मुलाने 'आई तुला माझं म्हणणच कळत नाही'
म्हणत शब्दांनाच बांध घातला...  
..  तिच्याच मुलाला ती निशब्द वाटणं.
अन त्याचं लहानपण आठवून,
कळतो का एखादया शब्दाचा अर्थ म्हणून तिचं धडपडणं                                          ... वा !