पारिभाषिक शब्दशोधाची सुविधा वापरून बघितली. बहुधा प्रकटित/उद्भासित देखाव्याचा चांगला वापर केला आहे. (व्यू ह्या शब्दासाठी प्रतिशब्द सापडला नाही.) ही सोय फारच उपयोगी ठरणार आहे ह्याबद्दल शंकाच नाही. मनापासून धन्यवाद. मराठीभाषा डॉट कॉम ह्या संकेतस्थळांच्या प्रमुखांचेही आभार मानायला हवेत.
तसेच कोशात भर किंवा दुरुस्ती इथेच सुचवायची काय? शोध घेतल्यावर एखाद्या शब्दाचा प्रतिशब्द न मिळाल्यास त्या शब्दाची नोंद झाल्यास उत्तम.