पायी चालणाऱ्यांवर सतत कर्णकर्कश भोंगा (हॉर्न) वाजवने ही अशा प्रकारच्या काही बाईकस्वार लोकांची चीड आणणारी सवय. रस्त्यात कुणी नसले तरिही ते भोंगा वाजवतच राहातात. ("ऑबसेसिव्ह कंपल्सिव भोंगा डीस ऑर्डर" हा रोग झाल्या सारखे)
--- ह हा हा.. वाचून हसू आले... आपण/आपले पायिक, पायी चालता वाटत.. नाही हा व्यक्तिसापेक्ष शेरा नाहिये, तर शंका आहे... स्वारगेट चा चौक हा लोकं महानगरपालिकेचा बाग-बगिचा असल्यासारखे चालतात.... अनेकदा मनात येतं कि "अंगावर गाडी घालावी... किंवा पायवरून चाक गेल्याशिवाय हे काही पटकन पुढे होणार नाहीत..:" पण, मग कंपनीने "हॉर्न" नामक वस्तू दिल्याची आठवणं होते.. आणि आपोआप अंगठा काम करू लागतो (REFLECS ACTION म्हणा... )
लक्ष्मीरस्ता/ बाजीराव रस्ता/फर्गुसन कॉलेज/वैशाली/जंगली महाराज रस्ता/हडपसर-वानवडी ह्या ठीकाणी फुटपाठवरून फक्त १०% माणसे जातात... बाकिचे तडफडायला रस्त्यावरून चालतात मग हॉर्न नाही वाजवून कसे जमणार ?