तुम्ही केलेल्या वर्णनावरून ह्या मुली फारच अल्पज्ञानी, कूपमंडूकी वगैरे असाव्यात असं दिसतंय... एव्हढं कुठे मनावर घेता.. मी तर अश्या लोकांना हसतो आणि सोडून देतो. फक्त पुण्याबद्दल बोलायचं झालं तर ही पुणेतर लोकांची (मग तो अगदी सासवड, बारामती चा का असेना) खोडच असते. आयुष्य पुण्यात गेलं तरी शेवटपर्यंत ते पुण्याला नावं ठेवण्यात धन्यता मानतात. त्यामुळे ह्याही गोष्टिचं वाईट वाटून घेऊ नका...