वेळ ही कल्पना आहे पण उशीर झाला, मी वक्तशीर नाही, आणि मग पर्यायानी परिणामांची कल्पना आणि भीती असं चक्र सुरू होतं हा प्रश्न आहे.
एक गोष्ट निखलास की तुम्ही कल्पना नाही त्यामुळे जोपर्यंत तुम्ही स्वतःशी संलग्न आहात तोपर्यंत कल्पनेचा तुमच्यावर परिणाम होत नाही पण एकदा का तुम्हाला कल्पना खरी वाटू लागली की मग स्वतःच विस्मरण आणि अस्वास्थ्याला सुरूवात होते, हे लक्षात आलं की सगळं सोपं आहे.
हे डिस्क्लेमर काय आहे? एकतर तुम्हाला समजलं किंवा नाही समजलं, जी गोष्ट समजते ती तुमचं आचरण होते, म्हणजे वेळ ही कल्पना आहे हे एकदा समजलं की तुमच्या चालण्यात फरक पडतो, बोलण्यात फरक पडतो, जीवनातली घाई संपते, डिस्क्लेमरचा काय अर्थ आहे?
संजय