अप्रतिम! अभिनंदन, मिल्या. गझल खूप सुंदर आहे. साऱ्याच द्विपदी आवडल्या. तरीही

इथे जो तो सुखाचे पीक घेई नित्यनेमाने
कशी राहील उपजाऊ अशाने येथली माती?

तुम्ही तर बोलला होतात रुजवू बीज ऐक्याचे
तरीही काल रक्ताने कुणाच्या... माखली माती?

अताशा वास मृदगंधासही का वेगळा येतो?
कशी झाली कळेना आज परकी... आपली माती

तुम्ही उपकार केले केवढे... गाडून माणुसकी
अरे तुमच्यामुळे तर ही पुन्हा गर्भारली माती

 ह्या चार  भाव खाऊन गेल्या.  एक सुंदर वाचनानुभव दिल्याबद्दल आभारी आहे.