यू ट्यूब वर एकेकाळी हे गाणे होते, दोन भागांत होते, दोन वर्षांपूर्वीपर्यंत होते. त्या काळात पहाटे हे गाणे कानावर नाही पडले तर व्यायाम, प्राणायाम इ. साठी मूड येत नसे. इतकेच नव्हे तर शेजाऱ्यांना सुद्धा याच सुरांनी जाग यावी म्हणून वॉल्यूम अंमळ मोठा करून ठेवण्याचे बालिश प्रमादही त्या काळात हातून घडलेले आहेत. (नंतर मग शेजाऱ्यांनी 'जेथे सागरा धरणी मिळते' किंवा तत्समचा रतीब वरताण आवाजात घालून चांगलीच खोड मोडली होती.{कोणतेही जुने गाणे ऐकणे म्हणजे रसिकतेची परिसीमा, असा एक नियम झाला आहे.}) गाणे उतरवून घेतले होते, अधिक दक्षता म्हणून लिंकही जपून ठेवली होती. पण एकदा कधीतरी साफ सफाई, डाउन साय्झिंग वगैरे किडे डोक्यात वळवळले आणि घर आणि कंप्यूटर दोन्ही हलके झाले. नंतर ते यू ट्यूब वरूनही गेलेले पाहिले आणि मोठी चुटपूट लागली.
' ना तो कारवां', खय्याम आणि रौशन यांच्यासंबंधीची तुम्ही सांगितलेली आख्यायिका खरी असावी,कारण 'गोरख एक धंधा' आणि 'ना तो कारवां' मध्ये प्रचंड साम्य आहे. ते आधी जाणवले होतेच, पण त्यातली गोम आता कळली.
'निगाहें मिलानेको' आवडते, पण 'लागा चुनरीमें दाग़' अधिक आवडते. अर्थात दोनही गाण्यांची कॅटेगरी वेगळी असल्यामुळे तुलना होऊ शकत नाही हे खरे.
'एरी आली पियाबीन' ऐकलेले आहे पण बारकावे आठवत नाहीत.
'नस्रत'चा उच्चार 'नुस्रत' आणि नस्रत यामध्ये कुठे तरी असावा असे वाटते. खरे का?
धन्यवाद.