वा, चित्त
योगायोग म्हणजे मी आत्ताच असा विचार करत होतो की बरेच दिवसात आपली रचना दिसली नाही, आणि नेमके तेव्हाच मनोगत उघडले तर आपली गझल दिसली.
कवीच्या काव्य-प्रवासात कधीतरी अध्यात्मिक म्हणावेत असे अनुभव किंवा तश्याच प्रकारचे अनुभव येत असावेत का ह्याचे मला नेहमीच कुतूहल वाटत आलेले आहे. पण ही रचना वाचून आपला काव्य-प्रवास एका अनोख्या, नव्या पर्वाच्या उंबरठ्यावर येऊन पोहचला आहे, ह्या विषयी मला तरी शंका नाही...

विचार करता-करता इतका लख्ख देखणा प्रकाश फुटला
सगळी पाटी कोरी झाली, सगळे शब्द निरक्षर झाले... असे शेर ह्याचीच ग्वाही देतात.. (मला बा. भ. बोरकरांच्या कविता वाचून असे काही अनुभव त्यांना नक्कीच आले असावेत, असे वाटत आले आहे. )
सगळे शब्द निरक्षर झाले... सिंपली सुपर्ब

.....शांत सरोवर झाले.. वा अतिशय तरल..
मला इक्बाल ह्यांचा -
मोती समझकर शाने-करीमीने चुन लिये,
कतरे जो थे मेरे अर्के-इन्फआलके... हा शेर आठवला.....

खूप खूप विषयांतर झाले.... वाह,खूब.... प्रत्येक वळण वाटेचे कंटाळून दमले होते. असा वा. न. सरदेसाई ह्यांचा एक सुंदर मिसरा आहे, तो स्मरला...

कधी अचानक फूल उमलले, कुठे विजेची रेघ उमटली
माझ्या साध्या ओळीचेही कसे कसे भाषांतर झाले.... वाहवा !!!... टेंडस टु इंफिनिटी.. एवढेच म्हणतो..

तुला पाहिले आणि एकटक, एकसारखा बघत राहिलो
बघता-बघता माझे बघणे तुझ्याहूनही सुंदर झाले !...  ह्या शेराचे सौंदर्य सांगायला माझ्याजवळ शब्द नाहीत.
मन आनंदले.
लिहीत राहावे
-मानस६