सुंदर.
विचार करता-करता इतका लख्ख देखणा प्रकाश
फुटला
सगळी पाटी कोरी झाली, सगळे शब्द निरक्षर झाले
गढूळलेल्या
डबक्यामध्ये एक थेंब ओघळला खळकन
जितके जितके तरंग उठले त्याचे शांत
सरोवर झाले
फूल, पाकळ्या, कळ्या, ऋतू,
दवबिंदू, तारे, चंद्र वगैरे...
खूप पाहिली वाट तुझी मी, खूप खूप
विषयांतर झाले
कधी अचानक फूल उमलले, कुठे
विजेची रेघ उमटली
माझ्या साध्या ओळीचेही कसे कसे भाषांतर झाले
ह्या दिपदी विशेष आवडल्या.