कविता वाचून.
अगदी पहिली द्विपदी वाचली तेव्हा प्रदीपराव आणि पाडगांवकरी शैली? असा प्रश्न पडला..
पण पुढच्या द्विपदी सगळ्या तुमच्या शैलीतल्या.
मी रोज मनाच्या काठी जातो, येतो..
शब्दांचे जंगल तिने सोडले जेव्हा... ह्या दोन द्विपदी विशेष आवडल्या.
ती स्वयंवरातच वृद्ध होउनी मेली... ह्या द्विपदीवरून एक संस्कृत श्लोक आठवला..
अद्यापि दुर्निवारं स्तुतिकन्या वहति कौमारम् ।
सद्भ्यो न रोचते साऽसन्तोप्यस्यै न रोचन्ते ॥
(स्तुतीरूपी कन्या अजूनही कुमारिकाच आहे. कारण सज्जनांना ती(स्तुती) आवडत नाही, आणि तिला (स्तुतीला) दुर्जन लोक आवडत नाहीत)