मोजून भलेही ताऱ्यांइतका पैसा....
आकाश कुणाला
खिशात भरता आले?
वावा!
मी रोज मनाच्या
काठी जातो; येतो...
मज आत आजही
कुठे उतरता आले?
वाव्वा!
सारीच रीत ही चुकली सांगायाची...
- हे भान कहाणी
सरता-सरता आले!
वाव्वा! क्या बात है. अप्रतिम.
नेहमीप्रमाणेच
सुरेख, प्रासादिक व सच्ची गझल. कुठेही
ओढूनताणून ठसा उमटवण्याचा ('इम्प्रेस' करण्याचा) प्रयत्न दिसत नाही. तसेच गझल ह्या
आकृतिबंधाचे सौदर्य तुमच्या गझलेच्या द्विपदींतून जागोजागी झळाळत असते. गझलेच्छूंनी पुन्हा पुन्हा वाचाव्यात अशा तुमच्या गझला आहेत. धन्यवाद.