मोकळीक येथे हे वाचायला मिळाले:
आधुनिक भारत आणि सत्याग्रही समाजवाद हे आचार्य भागवतांचे दोन महत्वाचे ग्रंथ. हिंदुस्थानातील ब्रिटीश साम्राज्याच्या विस्तारापासून म. गांधीच्या नेतृत्वाखालील स्वांतत्र्य चळवळ या वाटचालीची चिकित्सा आचार्य भागवतांनी आधुनिक भारत या ग्रंथामध्ये केली. आधुनिक भारत हा इतिहास नाही, विविध विचारधारा आणि त्यांचा सामाजिक-राजकीय आधार यांचा साक्षेपी आढावा आहे. या ग्रंथातच आचार्यांनी सत्याग्रही समाजवाद या संकल्पनेची मांडणी केली. मार्क्सवाद आणि गांधी विचार यांच्या समन्वयाचा प्रयत्न म्हणजे सत्याग्रही समाजवाद. सत्तेमध्ये प्रत्यक्ष सहभागी होणार नाही, सत्तेचे लाभ ...