असा कोणताही अनुभव मला व्यक्तिशः आलेला नाही किंवा वृत्तपत्रादी वाचनात जाणवलेला नाही. मात्र या घटनांचे एक कारण (मानसिक) असे असू शकते. सामान्यतः सर्व जनमानसावर फलज्योतिषाचा मोठा पगडा दिसतो. त्यात मनाचा संबंध चंद्राशी जोडलेला असतो. आपली फलज्योतिषावर (भलतीच) श्रद्धा असल्याने आपले मन नकळत अमावस्या - पौर्णिमेला घडणारे असे अपघात नोंदवून ठेवते आणि इतर दिवशीचे सोयिस्करपणे विसरते. त्यामुळे आपणास असे भासते की हे दिवस अशुभ असतात.
वैज्ञानिक दृष्ट्या अशा घटनांचे कोणतेही कारण दिसत नाही. (गुरुत्वाकर्षण वगैरे कारण चुकीचे आहे). संख्याशास्त्रीय दृष्ट्या या घटना व त्यांचा परस्पर संबंध कोणी प्रस्थापित केल्याचे ऐकिवात नाही. (कोणाच्या असल्यास कृपया कळवावे). तेव्हा हा सर्व एक समाज - मानसिक भ्रम असावा.