रेड एफ एम वर रात्री नॉटी नाईटस... नावाचा एक कार्यक्रम लागतो.... झोया नावाची आर जे आहे.... तिचे २ शो मी १-१ आठवड्याच्या अंतराने परत ऐकले आहेत....ऑफिसहून परत येताना बस मध्ये हा शो लावलेला असतो... त्यामुळे सध्या मी हा शो रोज ऐकते... गाणी, प्रश्न, जोक्स कशातच बदल नाही... एवढेच नव्हे तर ज्या व्यक्तीला तिने फोन वरून प्रश्न विचारले होते तो कॉलही तसाच वापरला होता...
ह्याच सोबत अजून काही आर जे च्या गमती सांगते...
रेडियो सिटी वर "आरती वुईथ अ डबल ए" नावाची आर जे आहे.... ती कधी कधी "मी आहे तुमची डबल ए" एवढ्याच नावाने स्वतःचा उल्लेख करते....
तिच्याबरोबर बंड्या नावाचे एक कॅरॅक्टर संध्याकाळी ६ ते ७ असते... तो खूप मस्त आहे... पण ह्या दोघांचे पण काही रेकॉर्डेड संवाद मी २ वेळा ऐकले आहेत...
एक छोटा छत्री नावाचे व्यक्तीमत्व कही चालू घडामोडींवर कविता वगैरे म्हणते... दिवसाला २-४ वेळा... ते भयानक आहे.... किंचाळत असतो हा माणूस.... भयानक आवाजात गातो.. असह्य होतं.... चॅनल बदलावेसे वाटते....
सिटी वर सकाळी डीजे नावाचा आर जे शो करतो... त्याची जाहीरात अशी आहे
एक बाई रिक्षावाल्याशी भांडत असते... रिक्षावाला म्हणतो.... ५० रुपये होतील...
ही बाई म्हणते.... काय? सकाळी सकाळी मीच सापडले का? थांब डीजे लाच सांगते...
आता ईथे हा डीजे काय करणार आहे...??
एक माणूस टॉयलेट च्या लाईन मधे.... अरे जल्दी कर प्रेशर बढ राहा है.... डीजे को फोन करू क्या??