अजून एक जमात आहे ,हे लोक पांढरे कपडे घालतात. आजन्म ब्रम्हचारी राहण्याची शपथ घेतात.ब्रम्हकुमारी आणि ब्राम्हकुमारम्हणतात त्याना. यांचे एक शिवबाबा आहेत .हे लोक नवरा बायकोने ही संबंध ठेउ नये असे सांगतात. मग हे लोक कुठून आले? ह्यांचे बाबा आहेत ते कुठून आले? परपुरुषाशी किव्हा परस्त्री शी संबंध ठेऊ नका असे सांगणे ठीक आहे. पण हे म्हणजे निसर्गाच्या विरुध्दच.सवाष्ण बाकाच्या हातचे हे पाणी सुद्धा पीत नाही.
भेटेल त्याला आपल्या सेंटर मध्ये यायचा आग्रह करतात. सात दिवसाचा कोर्स करायला म्हणतात. आम्हाला दान करा असे आग्रह करतात.मुख्य म्हणजे असे पांढरे बगळे खुप आहेत.लोकाना हे पटते कसे हे एक कोडे आहे.आणि अशा ठिकाणी जाउन माणसाला समाधान मिळते का? का संध्याकाळ चा वेळ घालवाण्यासाठी जागा हवी असते ?