अरुंधती,

मला पाऊस खूप आवडतो.  झिमझिमणारा, नुसतेच ढग जमून आलेत पण पाऊस नाही, गार वारा सुटलाय असे वातावरणही आवडते. त्यातून गारांचा पाऊस म्हणजे विशेष आवडीचा. लहानपणीच्या गारांची आठवण झाली. विजांचा लखलखाट, गडगडाट, सुसाट वारा, आणि मुसळधार पाऊस तर मला प्रचंड आवडतो. पावसाने कसे अगदी सगळ्यांना हेलकाऊन सोडले पाहिजे. अगदी असाच पाऊस कधी नव्हे तो आमच्या गावी कालच झाला. खूप बरे वाटले आणि आज सकाळी तुझा हा लेख. आणि हो काल मस्त गरम गरम बटाटेवडे करून खाल्ले.  सोबत नारळाची चटणी. खूप छान वाटते मला नेहमी असे काही झाले की.

पावसाचे वर्णन खूप सुंदर केले आहेस!

रोहिणी