नवा किंवा नवी हे दोन्ही चाललेच असते. जर 'नव्याने' छंदात बसत असता तर तो तीनही शब्दांत सर्वोत्कृष्ट ठरला असता, हे मला वाटते, मान्य व्हायला हरकत नाही. केवळ छंदात बसत नाही म्हणून 'नव्याने' वापरता येत नाही. त्यामुळे त्याच अर्थाचा 'नवें' वापरला तर तो नवा किंवा नवी यांच्यापेक्षा नक्कीच चांगला.  
कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेलां  या ओळीतल्या गेलां मधल्या ला वरचा अनुस्वार नवीन शुद्धलेखनाच्या नियमान्वये कुणी काढून टाकला तर ओळीचा अर्थ बदलतो. गेलां हे क्रियापदाचे द्वितीय पुरुषी (इथे आदरार्थी)अनेकवचन आहे. त्याचा अर्थ आपण गेलांत असा आहे. अनुस्वार काढला तर ते तृतीय पुरुषी एकवचन होईल. म्हणजे एक कुणीतरी बाबा(बुवा) गेला. चालेल? पण चालवून घ्यावेच लागते.' It=They=ते ' हे जसे चालवून घेतो तसे.
कवी नपुंसकलिंगी नाही.  त्या‌अर्थी नवे हा नपुंसकलिंगी शब्द नाही, म्हणजे तो अव्यय असला पाहिजे. क्रियाविशेषण अव्यय आहे असे लक्षात आले की नव्याने हा अर्थ उघड आहे.
नवें चा नव्याने हा ओढूनताणून काढलेला अर्थ नाही!--अद्वैतुल्लाखान