मी पूर्वी एक दोन वेळेला ह्या ब्रह्मकुमारींचं बोलणं टिव्हिवर ऐकलं होत. त्यांच्या दिनचर्येविषयी मला माहीत नाही, पण बोलतात छान. आणि काय हरकत आहे. आपण पर्फेक्ट साक्षात्कारी व्यक्तीकडूनच अध्यात्मिक उपदेश घेतला पाहिजे असं थोडच आहे. वेगवगळी लोकं वेगवेगळ्या फिलॉसॉफी वापरून जगत असतात. त्यांचं म्हणणं ऐकावं आणि आपण आपली स्वतःची विचारसरणी ठरवावी. शिवाय सगळ्या लोकांना स्वतःच्या 'आत' उत्तर शोधण्यात इंटरेस्ट नसतो, त्यामुळे ह्या बाबा लोकांचा उपयोग आपण परीक्षेच्या गाईड सारखा करू शकतो. ह्या लोकांच्या गोष्टी ऐकल्याने जसे आपण गोंधळून जाऊ शकतो तसेच अचानक कधी कधी आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे देखिल सापडतात.