पहिलं व शेवटचं कडवं आवडलं. भावना पोहोचल्या.
कवितेत थोड्या संपादनाला, काटछाटीला वाव आहे असे वाटते. उदाहरणार्थ
मग घेतला एक धागा दुक्खाचा एक निराशेचा
एक धागा अपयशाचा आणि एक धागा पराजयाचा
हे चारही धागे विणता एकमेकांमध्ये
आयुष्याला खरा अर्थ लाभला त्यांच्यामुळे
असे म्हटल्यानंतर
अपयशाशिवाय यश नाही
दुक्खाशिवाय सुख नाही
पराजयाशिवाय जय नाही
आणि निराशेषिवाय आशा नाही
हे सुभाषितवजा स्पष्टीकरण खरेच गरजेचे आहे?