हा धागा वाचल्यानंतर मी पण स्वतः: ला विचारून पाहिलं..आणि जी उत्तरं मिळाली ती तुम्हाला सांगू इच्छितो..
सध्या माझं वास्तव्य आहे उत्तर भारतामध्ये.. खरं तर दिल्लीमध्ये..नोकरीसाठी.. पण म्हणून मी इकडे कोणावर सक्ती नाही केली मराठी बोलायची..
पण माझ्या सारखे महाराष्ट्रीय बंधू आणि भगिनींना एकत्र आणायला मात्र मी झटत असतो.. त्या पैकीच एक उपक्रम मी आणि माझे सहकार्यानी मिळून चालू केला आहे.. तो म्हणजे ह्या दिल्लीकरांच्या नाकावर टिच्चून आम्ही महाराष्ट्रीय बंधू आणि भगिनी दर ३ महिन्यानी छोटासा चहापानाचा समारंभ आयोजीत करतो आणि त्या समारंभात नवागतांची ओळख, वाढदिवस साजरे करणे ई. ई. उपक्रम राबवतो.. सोबतच मराठी पुस्तकांची, चित्रपटांची, गाण्यांची देवाण घेवाण वगैरे करतो.. आवर्जून सण साजरे करतो..
थोडक्यात काय? तर "आम्ही मराठी" हा आवाज 'तिकडे' पण निनादला पाहिजे हे बघायचं..