व्हीसीआर वापरतानाचे अनुभव आठवले. सिनेमातली गाणी रेकॉर्ड करताना आयत्या वेळेस कधी कॅसेट बाहेर यायची. साठवलेली गाणी पाहताना कॅसेट जुनी झाल्यावर चित्र उडायचे व हेड साफ केले नाही तर चित्र दिसायचेच बंद व्हायचे. टेप चिकटून माझ्या अनेक कॅसेट आता धूळ खात पडल्या आहेत. व्हीसीआर तर कधीच मोडला. पण त्याने १० वर्षे चांगली सर्व्हिस दिली.