मुजोरी फक्त माझ्याशी कशाला?
तसा वचकून असतो तू जगाशी..

एखाद्याशी वचकून असणे असे ऐकल्यासारखे वाटत नाही. वचकण्याला द्वितीयेची अपेक्षा आहे असे वाटते. (उदा. एखाद्याला वचकून असणे.)
शिवाय वचकून असतोस असे असायला हवे होते असे वाटते.

ह्याऐवजी (अर्थ त्यातल्या त्यात कायम ठेवणारी) एक सुचवण

मुजोरी फक्त माझ्याशी कशाला
तसा गोडीत अससी तू जगाशी

(अससी हे रूप जुने वाटते हे खरे; पण तुम्ही 'मिळे' असेही वापरलेले आहे, तेव्हा हेही चालायला हरकत नसावी. )

चू. भू. द्या. घ्या.