लेख खूपच आवडला. चालणे हा माझा फार जिव्हाळ्याचा विषय आहे. मलाही एकटे चालायला खूप आवडते. हिंजवडीवरुन चिंचवडपर्यंत आठवड्यातून निदान तीनदा तरी पायी चालत येण्याचे धोरण मी गेली दोन वर्षे कटाक्षाने पाळले होते. अनेकदा बसची वाट पाहून, वैतागून शिवाजीनगरपासूनही चिंचवडपर्यंत चालत आलो आहे. डोंगरदऱ्या तुडवताना जितका आनंद मिळतो तितकाच आनंद शहरातल्या रस्त्यांवरुन चालताना मिळतो.

[सध्या हिंजवडीकडे जाणाऱ्या कोणत्याही रस्त्यावर ट्राफिक फारच वाढल्यामुळे धूर व धुळीच्या तडाख्यात चालणे अशक्यच झाले आहे. तरी हिंजवडीपासून वाकड पोलीस चौकीपर्यंत (फेज २ च्या पर्यायी रस्त्याने) चालत येणे अजूनही शक्य आहे.]