यावर आधारित दुसरा पीजे म्हणजे वोचे पिताश्री सचिन तेंडुलकर, ते कसे काय? तर सारा जहाँ है वो. म्हणजे वो=सारा, आणि साराचे वडील सचिन

हे तितकेसे पटले नाही. यात 'जहाँ' या शब्दाचा हिशेब लावायचा राहिल्यासारखे वाटते.

'सारा' जेथे आहे तेथे 'वो' यावरून वो=सारा नसून वो ही साराची 'जेथे जाते तेथे तू माझी सांगाती' छापाची सोबतीण असावी असे वाटते. साराचे वडील सचिन असतीलही (नाही म्हणजे शंका घेण्याचा हेतू नाही.), पण तिच्या सोबतिणीचेही वडील कसे असू शकतील?

की सारा जेथे आहे नेमक्या त्याच कोऑर्डिनेटसना (मराठी?) एकसमयावच्छेदेकरून वो आहे यावरून वो=सारा असा तर्क बांधला आहे?