वाचनात येणाऱ्या गहन किंवा अगदी सरळ वळणानी जाणाऱ्या कवितांचे अर्थ पोचेनासे झालेत.. अं! त्यात काय एवढ ? अस काहीसं फिलींग यायला लागलं, एखाद्या कवितेच्या अर्थानी अस्वस्थ व्हायला व्हायच ते होईनासं झालं थोडक्यात कोरडेपणा यायला लागला... मग हे अस का होतय? याचा शोध घेतल्यावर जाणवतं शब्दांशी होणारी जास्त सलगी हे कारण असेल का ? का, कधीतरी मनाला झालेली जखम शब्दांनी चिघळण्याएवढी हळवी राहिलेली नाही हे कारण.... का दोन्हीची शक्यता आहे? संभ्रमच...