उर्दू गजल ही शास्त्रिय संगीतातल्या 'खयाल' सारखी असते. ती एकाच मूडची एकसंध अभिव्यक्ती असते. उर्दू गजल एक माहौल तयार करण्याचा प्रयत्न करते. (मराठी गजलला असे बंधन नाही असे बिनधास्त विधान मी वाचले आहे त्यामुळे मराठी गजलच्या एका शेराचा दुसऱ्याशी काहीही संबंध नसू शकतो). उर्दू गजलचा अर्थ समजण्यासाठी हे लक्षात घेणं अनिवार्य आहे, त्यामुळे हा शेर:

इन्हीं सिफ़ात से होता है आदमी मशहूर
जो लुत्फ़ आप ही करते तो नाम किस का था

असा असेल:

इन्हीं सिफ़ात से होता है आदमी मशहूर
जो लुत्फ़ आप ना करते तो नाम किस का था

याचा सरळ अर्थ : इतरांवर मेहेरनज़र करून व्यक्ती लोकप्रिय होते, जर तू मेहेरबान नसशील तर मग ती कोण आहे? असा आहे.

गर्भित अर्थ फार सुरेख आहेः  उर्दू मध्ये प्रेयसी प्रियकरावर कधीही मेहेरबान होत नाही पण ती आपल्यावर मेहेरबान होईल अशी प्रत्येकाला आशा असते आणि म्हणूनच ती मशहूर होते. दाग म्हणतो तू जर (अशी) मेहेरबान नसशील तर मग ती कोण आहे?

संजय