चालणें हा एक मस्त, आनंददायक अनुभव आहे. पुढच्या खेपेस विद्यापीठाहून निघाल्यावर ब्रेमेन चौकांत उजवीकडे वळून आंतल्या वळवळणांच्या रस्त्यानें सांगवी, नवी सांगवी, पिंपरी वरून चिंचवडला जाऊन पाहा. हमरस्त्यापेक्षां या तुलनेनें छोट्या रस्त्यावरून चालणें सोपें आणि आनंददायक आहे. पुण्याप्रमानेंच वसई, कारवार आणि गोवा येथील रस्ते देखील छोटे वळणावळणांचें आणि वृक्षाच्छादित आहेत. परंतु वसई आणि गोवा येथें उष्ण आणि दमट हवेमुळें घाम झर्रकन वाळत नाहीं आणि फार थकवा जाणवतो. पुण्यांत मात्र हवा त्या मानानें कोरडी आणि थंड आहे.