नमस्कार!
हर्षल खगोल यांच्या प्रतिसादाबाबत:
तुम्ही वर म्हटलंय, "वैज्ञानिक दृष्ट्या अशा घटनांचे कोणतेही कारण दिसत नाही. (गुरुत्वाकर्षण वगैरे कारण चुकीचे आहे). संख्याशास्त्रीय दृष्ट्या या घटना व त्यांचा परस्पर संबंध कोणी प्रस्थापित केल्याचे ऐकीवात नाही. (कोणाच्या असल्यास कृपया कळवावे). तेव्हा हा सर्व एक समाज - मानसिक भ्रम असावा."
तुम्ही खरेच वैज्ञानिकदृष्टीचे आहात का? तुमच्या ह्या उत्तरातून तुम्ही तसे नाहीत हे कळतं.
मग वैज्ञानिक दृष्ट्या अशा घटनांचे कोणतेही कारण दिसत नाही? असे ठाम पणे कसे म्हणू शकता. विज्ञानाची जी पद्धत आहे त्यानुसार ठामपणे 'होकार' वा 'नकार' देण्यासाठी तशी 'निरीक्षणं नोंदवून', वेगवेगळ्या पद्धतीने परीक्षणं करून , त्यांचा आभ्यास करून मगच 'सिद्धांतावर पोहचावे लागते. 'अशा पद्धती जपणाऱ्या विज्ञानाच्या दृष्टीने, पुर्णिमा-अमावास्येचा (सूर्य-चंद्र यांच्या गुरुत्वाकर्षणाचा) मानवी मनावर कोणताच संबंध नाही' असा निवाडा तुम्ही आधीच करून टाकला. ते कसे?
खऱ्या वैज्ञानिकदृष्टीचा माणूस कोणतेही विधान करण्यापूर्वी त्याबाबत आधी स्वतः त्याबाबतचा छडा लावण्याचे काम करतो.
मूळ लेखाबद्दल:
पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत फिरते, चंद्र पृथ्वी भोवती प्रदक्षिणा घालत फिरते. हे दिवस साधारण पणे ३६५ भरतात. पाश्चिमात्यांनी हे वास्तविक सत्य स्वीकारले. त्याप्रमाणे कालगणनेत सुधारणा केली. सध्या आपण वापरतो ती दिनदर्शिका वरील सत्याचा अवलंब करते परंतु पूर्णिमा-अष्टमी-अमावास्या-अष्टमी या सूत्राचा वापर करीत आठवड्याच्या सार्वजनिक सुट्ट्यांचा वापर करीत नाहीत.
साप्ताहिक सार्वजनिक सुट्ट्यांबाबत अजून ख्रिश्चन धर्माचाच पगडा आहे.
पृथ्वी प्रत्यक्षात सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. या शास्त्रीय तत्वावर आधारीत भारतीय बुद्धिवंतानी याआधीच सौरदिनदर्शिकेचा मार्ग दाखविलेला आहे. फक्त त्याचा प्रसार व वापर करण्याबाबत प्रत्यक्ष भारत सरकारच उदासीन आहे.
दुवा क्र. २
भारतीय सौरदिनदर्शिके मध्ये मात्र सप्ताहाची ( आठवड्याची) मांडणी चंद्राच्या 'पोर्णिमा-अष्टमी-अमावस्या' या कोष्टकावर बेतली जायला हवी. या तीन दिवशी मानवी मनावर होणारे अनिष्ट परिणाम टाळण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी साप्ताहिक सुट्टी दिली जायला हवी. अशा सुट्ट्यांची मांडणी असलेल्या सौरदिनदर्शिकेचा प्रसार केला जायला हवा. तसे झाले तरच अशास्त्रीय कालमापन पद्धतीच्या अवलंबनामुळे समाजामध्ये, सर्वसामान्यांच्या सार्वजनिक आयुष्यात विकृत गोष्टींना अटकाव करता येईल. तसेच हिंदू, बौद्ध ह्या धर्मांच्या सुट्ट्या देखील या तीन दिवसात येण्याने सरकारी सुट्ट्यांचे वेळापत्रक बसवता येईल जेणेकरून सार्वजनिक (काम कमी करणाऱ्यांच्या) सुट्ट्यांदेखील कमी होतील.