कोऑर्डिनेटस म्हणजे अक्षांश-रेखांश.  इथे निर्देशक हा प्रतिशब्द लागू पडणार नाही.  निर्देशक म्हणजे मराठीत दिशा दाखवणारा; उल्लेख करणारा; मोजमाप सांगणारा(उदा. निर्देशांक); इंडिकेटर;  गाइड, वगैरे.  (उदा. निर्देशक शब्द=गाइड वर्ड). हिंदी निर्देशक म्हणजे चित्रपटाचा  डायरेक्टर. मराठीत चित्रपट-नाटकाच्या डायरेक्टरला दिग्दर्शक म्हणतात. संस्थेच्या डायरेक्टरला हिंदीत निदेशक म्हणतात, तर मराठीत संचालक.--अद्वैतुल्लाखान